महाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रहितासाठी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर आणि खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचे द्योतक असल्याची घणाघाती टीका Harshvardhan Sapkal यांनी केली आहे. “जनतेनेच सतत त्याग करायचा आणि मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का?” असा संतप्त सवाल करत “राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदी यांनीच वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे, ही १४० कोटी जनतेची भावना आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, संभाव्य आर्थिक संकटासाठी जगातील अनेक देश नियोजन आणि तयारी करत असताना मोदी सरकार आणि भाजप निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाच्या राजकारणात गुंतले होते. “नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजी, अहंकारी आणि लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे,” असे ते म्हणाले.

देशात इंधन आणि एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला. “निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी करण्यात आली आणि आता जनतेलाच त्यागाचे उपदेश दिले जात आहेत. स्वतः मात्र ४०-५० गाड्यांच्या ताफ्यासह फिरतात,” अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता, मात्र सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत सपकाळ म्हणाले की, “कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करण्यात येत होते. नोटबंदी, जीएसटी आणि कोविड संकटानंतर आता देशावर आणखी मोठे संकट आले असून त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

11 तास ago