महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

मुंबई: संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात संतशक्तीचा व शासनसत्तेचा समन्वय साधत, वारकरी संप्रदायाचे सक्षमीकरण, कीर्तनकारांचा गौरव, दिंड्यांना शासनमान्यता, आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे शिंदे यांनी समाजसेवा व अध्यात्माची खरी पताका उंचावली आहे. संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र, व उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहचवणारे झाले, तसेच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संतविचारांचा शासनसत्तेतुन जागर’ घडवला आहे. त्यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना अशा प्रकारे इतिहासातील प्रथमच पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. असे मत उत्सव प्रमुख श्री निवृत्तीमहाराज नामदास यांनी व्यक्त केले.

या पुरस्काराच्या माध्यमातून संतमहिमा व शासनसत्तेचा संगम घडवणाऱ्या शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभणार आहे अशी भावना वारकरी संप्रदायातून प्रकट होत आहे.

हा गौरव सोहळा गुरुवार, दि. २४ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२.०० वा. श्री केशवराज मंदिर, संत नामदेव महाराज वाडा, पंढरपूर येथे संपन्न होणार असून, या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील संत वंशज, फड परंपरेचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे मान्यवर, कीर्तनकार, पंजाब व उत्तर भारतातील भक्त उपस्थित राहणार आहेत. संत नामदेव महाराजांच्या तीन पिढ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे प्रत्यक्ष निमंत्रण शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथील निवास्थानी देण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

6 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

6 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

6 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

7 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

7 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

7 तास ago