महाराष्ट्र

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पुढाकार

मुंबई: समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या पहाटे घडली. दीड वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. रस्त्यावर फुले विकून उदरनिर्वाह करणारे आणि जवळच्याच फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली, तिच्यावर अत्याचार करून तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील कचऱ्याच्या गटारात फेकून दिले.

त्या सकाळी कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दुपारी ३ वाजता गंभीर जखमी अवस्थेत मुलीचा शोध लावला. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचलित नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती अजूनही अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर कारवाई

ही दुर्दैवी घटना एका सामाजिक कार्यकर्त्यामार्फत कळताच शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित दखल घेत पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी समन्वय साधून मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत याची काळजी घेतली तसेच पोलीस आयुक्तांशी संवाद साधून तिच्या सुरक्षिततेला आणि तपासाला प्राधान्य देण्यास सांगितले.

“आपल्या समाजात काही विकृत प्रवृत्तीचे लोक सर्वात असुरक्षितांवर अत्याचार करून सुटतील असे समजतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असे शायना एनसी यांनी सांगितले. “परंतु यावेळी आपण सर्वजण एकत्र येऊन लढा देऊ. या निरपराध दीड वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.”संबंधित यंत्रणांनी तपासाला गती द्यावी, पीडितेला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे शायना एन सी यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…

2 तास ago

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन…

5 तास ago

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

5 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago