महाराष्ट्र

बदर समितीचा अहवाल जाहीर केल्याशिवाय उपवर्गीकरणाचे विधेयक आणू नका; विजय वडेट्टीवार

मुंबई: अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईत निघालेल्या मोठ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. अहवाल जाहीर करून सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय उपवर्गीकरणासंदर्भातील कोणतेही विधेयक आणू नये, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

वडेट्टीवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे अनुसूचित जातीतील शोषित, वंचित आणि पीडित समाजाला आरक्षणाचा घटनात्मक अधिकार दिला असून या आरक्षणामध्ये ५८ जातींचा समावेश आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न अत्यंत घातक ठरेल, असे त्यांनी सांगितले.

आज लाखो समाजबांधव रस्त्यावर उतरून उपवर्गीकरणाला विरोध करत असताना सरकारने घाईघाईने निर्णय घेऊ नये, असे आवाहन करत त्यांनी न्या. अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याची टीका केली. अहवाल जाहीर न करता त्यावर हरकती व सूचना मागविणे हे पारदर्शकतेच्या तत्त्वाला छेद देणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ घटनात्मक तरतुदी आणि गुणवत्तेनुसार दिला जातो. ५८ जातींमध्ये भेद निर्माण करून दलित समाजाला एकमेकांसमोर उभे करणे योग्य नसून, अशा संवेदनशील विषयावर समाजातील सर्व घटकांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.दरम्यान, या विषयावर विरोधकांना सभागृहात भूमिका मांडण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभात्याग केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

4 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

4 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

19 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago