महाराष्ट्र

मोठ्या पगाराचे आमिष दाखवून तरुणांची आंतरराष्ट्रीय तस्करी, सुटकेसाठी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना म्यानमार-थायलंड सीमेवरील छळछावण्यांमध्ये डांबून जबरदस्तीने सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन संबंधित तरुणांच्या तातडीच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागांतील २० ते २५ तरुण, तर देशभरातील सुमारे ७०० ते ८०० तरुण म्यानमार-थायलंड सीमेवरील ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरातील छळछावणीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांना शारीरिक छळ करून त्यांच्याकडून सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहोचला असून, अडकलेले तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून सुटकेचे प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयातून संबंधित तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात यावी. तसेच सोशल मीडियाद्वारे मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

3 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

3 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

19 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago