महाराष्ट्र

खचू नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका: अजित पवार

मुंबई: विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना मंगळवारी विधान भवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांची विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची आस्थेने चौकशी केली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, असा धीर देत, टोकाचे पाऊल उचलू नका, अशी विनंती करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना आज दिले. शेतीच्या प्रश्नामुळे त्रस्त असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधान भवनाच्या प्रवेशव्दारावर समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यामध्ये सुभाष देशमुख काही प्रमाणात भाजले आहेत. त्यांना उपचारार्थ मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शेतकरी सुभाष देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांची अडचण जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनंती केली. त्यांच्या शेतीचा प्रश्न सोडविण्यासाठी विरोधी पक्षाच्यातवीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अजित पवार यांनी दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

54 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago