राजकीय

२०१४ पासून देशात आणीबाणी, लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार!

मुंबई: लोकशाही व संविधानाच्या तत्वांवर देशात आजपर्यंत सरकारे काम करत होती. परंतु २०१४ पासून भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरु असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे, असा थेट हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा फोडा व राज्य करा, या इंग्रजांच्या नितीप्रमाणे राजकारण करत असून जे नेते वा राजकीय पक्ष भाजपाला साथ देत नाहीत त्यांच्या घरांवर सीबीआय, ईडीची कारवाई केली जात आहे. देशातील विरोधक संपवण्याचे काम भाजपा करत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या मनीष सिसोदिया, तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराच्या घरावर सीबीआयने टाकलेले छापे हेच दाखवतात. सीबीआय, ईडी, आयकर या यंत्रणांचा राजकीय इप्सित साधण्यासाठी भाजपा गैरवापर करत आहे. बिहारची सत्ता गेल्याने भाजपा बिथरली आहे. भाजपाची साथ देणाऱ्यावर कारवाई होत नाही. देशात इंग्रजांपेक्षाही क्रूर पद्धतीने भाजपा काम करत आहे.

जनतेत दिलेल्या आश्वासनाचा भाजपाला विसर पडला आहे. महागाई कमी करु, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, परदेशातून काळा पैसा परत आणू अशी वारेमाप आश्वासने देऊन भाजपा केंद्रात सत्तेवर आला पण सत्तेत आल्यापासून हे सरकार फक्त मुठभर उद्योगपतींसाठीच काम करत आहे, जनतेसाठी नाही. देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न आहेत पण ते सोडवण्यात केंद्र सरकार फेल झाली आहे म्हणून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहेत. जनता भाजपाला कंटाळली असून आगामी निवडणुकीत लोक भाजपाला घरचा रस्ता दाखवतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

14 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

15 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago