महाराष्ट्र

डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करुन ई-लर्निंग स्टुडिओचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, विद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

18 तास ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

20 तास ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

23 तास ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

1 दिवस ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

1 दिवस ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

1 दिवस ago