संभाजीनगर: महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेमधील एक अत्यंत विश्वसनीय आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील. परंतु त्यांच्याच चेहऱ्याचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या सहाय्याने गैरवापर करूनछत्रपती संभाजीनगर येथील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांनी गंडवण्यात आलं, ही घटना धक्कादायक आहे.
घटना कशी घडली
छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध अधिकाऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉल केला.
फोनवरील व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी सांगत असं सांगितलं की, तुमच्या खात्यातून 20 लाख रुपये दहशतवाद्यांच्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत. या कारणावरून “डिजिटल अरेस्ट” होऊ शकतो, अशा धमक्या देत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
AI वापरून बनावट चेहरा
गुन्हेगारांनी AI चा वापर करून एक असा व्हिडीओ तयार केला ज्यात विश्वास नांगरे पाटील यांचा चेहरा वापरला गेला होता. त्याच्यासारखं बोलणं, चेहऱ्याची हालचाल, आणि वर्तन हुबेहुब होतं, त्यामुळे दाम्पत्याला खोटं वाटलंच नाही. यामुळे २ ते ७ जुलै दरम्यान रोज फोन करून दबाव टाकण्यात आला आणि टप्प्याटप्प्याने वृद्ध दाम्पत्याकडून तब्बल ₹78.60 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणात आता सायबर गुन्हेगारांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
लक्षात ठेवा
“डिजिटल अरेस्ट” असं काहीही कायद्यात अस्तित्वात नाही. हा एक सायबर गुन्हेगारांचा बनाव आहे, जो लोकांना घाबरवून पैसे उकळण्यासाठी वापरला जातो.
सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी…
1930 वर कॉल करा; सायबर फसवणुकीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन https://cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. घरातील ज्येष्ठ नागरिकांना या प्रकारांची माहिती द्या
नागरिकांसाठी महत्वाचा संदेश
कोणताही अधिकारी किंवा पोलीस व्हिडीओ कॉलवरून तुमच्याकडून पैसे मागत नाही.
कुठलीही शंका आली तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा.
“AI चेहऱ्यांद्वारे फसवणूक” ही नवी पद्धत आहे. त्यामुळे अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.
व्हिडीओ कॉलवर ओळखीचा चेहरा दिसला म्हणून विश्वास ठेऊ नका.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…