महाराष्ट्र

लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहे

सरकार भाजपचे असल्याने विकास निधीची भाषा करून धमकावले जाते आहे त्यामुळे निवडणुका पारदर्शक होतील का?

नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी,मामे भाऊ, दीर,बहिण,मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले,अनेक ठिकाणी गुलाल उधळला इथे लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर इथे माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सत्ता महायुतीची असल्याने संपूर्ण यंत्रणा वापरली जाते आहे. कुठे पैशाचे प्रलोभन दाखवून कुठे पोलिस बळ वापरून निवडणुका बिनविरोध केलेल्या आहेत . दादागिरी, गुंडगिरी करून सत्ताधाऱ्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आले आहेत .त्यामुळे जिथे निवडणुका होतील तिथे निवडणुका पारदर्शक होतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एके ठिकाणी प्रचार तर भाजपची महिला उमेदवार थेट सांगत आहे मतदान करा नाहीत गाठ माझ्याशी आहे,निधी देणार नाही,विकास होणार नाही,मुख्यमंत्री भाजपचा असल्याने पदाधिकाऱ्यांना पण जोर चढला आहे जनताच आता याबाबत ठरवेल, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. सरकार शेतकऱ्यांना पैसे देत नाही, कंत्राटदारांची एक लाख कोटीची बिल थकवली आहेत. त्यांना पैसे देत नाही पण निवडणुका आल्या म्हणून आपल्या आमदाराना द्यायला सरकारकडे पैसे आहेत. राज्य तर दिवाळखोरीकडे निघाले आहे पण सरकारची पण अकलेची दिवाळखोरी जास्त झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

निवडणुका आल्या की भाजपचे सर्व्हे येतात,बहुमत मिळणार अशा बातम्या येतात. हे सर्व्हे भाजप करते, बातम्या पण भाजपच देते.लोकांना मूर्ख बनवण्याचे हे भाजपचे उद्योग आहेत. मुंबईत आता मतदार आयडी सापडले आहेत,जसे महाराष्ट्र आणि बिहार मध्ये केलं तश्याच मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची असेल.बॅलेटवर निवडणुका झाल्या की दूध का दूध होईल, खरे जनमत स्पष्ट होईल अस वडेट्टीवार म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago