महाराष्ट्र

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला.

सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ग्रामविकास विभाग वगळता इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामविकास विभागप्रमुखाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असल्याने कर्मचारी वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवाल खंड दोनमधील वेतन श्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत शासन वित्त विभागाच्या वेतन त्रुटीबाबत सूचना निर्गमित झालेल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी संवर्ग वगळता सर्वच कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे. या विरोधात आता जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सर्व संघटना आक्रमक पवित्रा घेऊन कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यावेळी अध्यक्ष लिपिक संघटना वंदना बांदल, उपाध्यक्ष आबासाहेब सरोदे, गुलाबराव खरबस, दिलीप धोत्रे, मच्छिद्र सारूक, भुजंगराव कर्पे, बिऱ्हाडे, सविता सालके, विनिता माने, योगिता गाडेबैल, विलास कोकाटे, आदी कर्मचारी ऊपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

3 दिवस ago