महाराष्ट्र

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) फेब्रुवारी २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधर उमेदवारांचे नुकसान होत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे (दि. २५) जानेवारी २०२३ पासून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात धरणे आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा (निकाल) मुलाखत २०२१ व महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२२ ला स्थगिती ला स्थगिती मिळावी. मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करुन कृषी अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी. राज्यासाठी स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे आदी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वरील मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन न्याय द्यावा, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago