महाराष्ट्र

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवारांनी आपलं राजकीय भवितव्य आजमावलं.

मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. एकूण 731 जिल्हा परिषद जागांपैकी भाजप 263 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार शिवसेनेला 156 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 118 जागांवर समाधान मानू शकतो. काँग्रेसला 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 48, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 42 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, तर इतर व अपक्ष उमेदवारांना 37 जागा मिळू शकतात.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी केलेली युती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या युतीचा फारसा फायदा झाल्याचं दिसत नाही. याउलट भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ग्रामीण भागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना आणि काँग्रेसची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली असून काही पारंपरिक गड त्यांनी राखले असले, तरी एकूण बहुमतासाठी त्यांची संख्या अपुरी ठरत असल्याचं एक्झिट पोल दर्शवतो.

दरम्यान, हा एक्झिट पोल केवळ अंदाज असून अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीवरून भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

9 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago