मुंबई: ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे केलेले वक्तव्य बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच गिरीष महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली.
सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नसून देशाच्या अखंडतेला आव्हान देणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाली, तर या मोहिमेचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
गिरीष महाजन यांच्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका समोर आली असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, असे सांगत त्यांनी महाजन यांच्या विधानाचा निषेध केला.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील त्या काळातील सुरक्षा मोहिमांशी संबंधित होते. मग त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार का, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.
महाजन यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची तुलना महंमद शाह अब्दालीशी करून भारतीय सैन्यदलाचाच अपमान केला असून खलिस्तानी दहशतवादी जर्नैलसिंग भिंद्रनवाले याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून केलेले वक्तव्य हे सरकारचे अधिकृत धोरण आहे का, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीष महाजन यांच्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशासाठी बलिदान दिलेल्या नेतृत्वाचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल गिरीष महाजन यांनी देशाची आणि सैन्यदलाची माफी मागावी, तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…