महाराष्ट्र

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत आदिवासी विकासासाठी सरकार कटिबद्ध; एकनाथ शिंदे

मुंबई: भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि हक्कांचे संरक्षण यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकभवनातील दरबार हॉल येथे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी स्वाभिमान, जल-जंगल-जमीन हक्क आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचे प्रतीक आहेत. अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या विचारांतून समाजाला स्वाभिमान, एकता आणि संघर्षाची प्रेरणा मिळते.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी समुपदेशन सुविधा तसेच परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोलीसह दुर्गम भागांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देऊन आदिवासी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय आदिवासींच्या योगदानाचा सन्मान करणारा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारची वचनबद्धता कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

12 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago