संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या जमिनीची अधिकृत माहिती असणारा सातबारा (7/12) उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये मालकीहक्क, क्षेत्रफळ, पीक, कर्ज, विक्री इत्यादी नोंदी असतात. मात्र, या उताऱ्यातील काही लहान वाटणाऱ्या पण गंभीर चुकांमुळे तुमची जमीन विवादित किंवा बेकायदेशीर ठरू शकते.
चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या ७ मोठ्या चुका…
मालकाचे नाव चुकीचे असणे
नावात एखादं अक्षर चुकलं, वडिलांचं नाव चुकीचं असेल किंवा अपूर्ण नाव असल्यास जमिनीवरील तुमचा हक्क सिद्ध करणं कठीण होत.
वारस नोंद न झालेली असणे
मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही वारसांची नोंद नसेल, तर ती जमीन “मृत व्यक्तीच्या” नावावरच राहते. विक्री, कर्ज किंवा वाटप प्रक्रिया ठप्प होते.
क्षेत्रफळ चुकीचे नोंदलेले असणे
मोजणीतील चूक म्हणजेच सातबारा आणि प्रत्यक्ष क्षेत्र यामध्ये फरक यामुळे सीमाभांडे, कोर्ट केसेस होऊ शकतात.
चुकीची कर्ज नोंद
जुने कर्ज फेडलेले असतानाही ते सातबाऱ्यावर दिसते. मग कर्जमुक्ती प्रमाणपत्र मिळत नाही आणि नवीन कर्जही थांबत.
अतिक्रमण किंवा गैरवापराची नोंद नसणे
शेती जमीन जर घरबांधणीसाठी वापरली जात असेल आणि सातबाऱ्यात ती माहिती नसेल तर ती जमीन बेकायदेशीर ठरते!
पीक नोंद चुकीची असणे
खरीप / रब्बी हंगामातील पीक नोंद चुकीची असल्यास विमा, नुकसान भरपाई, योजना यासाठी अपात्र ठरू शकता!
अद्ययावत नोंदींचा अभाव (मिळकत वाटणी)
मिळकतीचे वाटप झालेले असूनही सातबाऱ्यावर त्याची नोंद नसेल, तर कागदपत्रं, विक्री, कर्ज प्रक्रिया थांबते.
उपाय काय
सातबारा नियमित तपासा
खरेदी-विक्री, वारस नोंद, कर्ज प्रक्रियेपूर्वी. नोंदी चुकीच्या असल्यास तलाठी/मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार करा. https://mahabhulekh.maharashtra.gov.in या पोर्टलवरून ऑनलाइन सातबारा डाउनलोड करून पडताळणी करा.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…