महाराष्ट्र

अखेर उद्धव ठाकरेंची ती इच्छा पूर्ण, इंडिया आघाडीच्या बैठकीतून मोठी बातमी

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला 24 पक्षांची उपस्थिती होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली.

समोर आलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकील 24 पक्षांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारायचा यावर रणनीती आखण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनामध्ये आठ प्रमुख मुद्दे उपस्थित केले जाणार

1) पहलगाम दहशतवादी हल्ला, दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत?

2) ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी आणि ट्रम्प यांचा दावा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 24 वेळा असा दावा केला की व्यापार कराराच्या बदल्यात युद्धबंदी करण्यात आली होती, या मुद्द्यावर पंतप्रधान गप्प आहेत. पंतप्रधानांनी यावरील चर्चेदरम्यान उपस्थित राहावे आणि उत्तर द्यावे.

3) एसआयआर मतदानावर बंदी, मतदानाचा अधिकार धोक्यात आहे.

4) ⁠परराष्ट्र धोरण: चीन, गाझा बद्दल

5) दलित, अल्पसंख्याक, महिलांवरील अत्याचार

6) सीमांकन

7) अहमदाबाद विमान अपघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ॲापरेशन सिंदूर संदर्भात होणाऱ्या चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित रहावं यावर विरोधक आग्रही आहेत . मोदींनी ॲापरेशन सिंदूर बाबत सभागृहाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधकांची आहे, या बैठकीत या मुद्द्यावर जोर देण्यात आला आहे. पहलगाम हल्ला झाला, त्यातील दहशतवादी अजूनही का पकडले गेले नाहीत, यावरून विरोधक या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारला घेरण्याच्या तायरीमध्ये आहेत.

दरम्यान इंडिया आघाडीची पुढची बैठक लवकरच होणार आहे, काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीपूर्वी इंडिया आघाडीची बैठक व्हावी, अशी इच्छा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती, त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago