महाराष्ट्र

वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई: भारतात उत्पादित होणाऱ्या पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. २०२५ च्या अखेरीस पहिली मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात उपलब्ध होईल, असं मोदी म्हणाले. तसेच, मेड इन इंडिया 6 जी नेटवर्क विकसित करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी मोदी म्हणाले, “या वर्षाच्या अखेरीस पहिली स्वदेशी विकसित सेमीकंडक्टर चिप बाजारात येईल.” इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने दशकांपूर्वी देशांतर्गत सेमीकंडक्टर तयार करण्याची संधी गमावली होती, परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सर्वांना माहित आहे की सेमीकंडक्टर उत्पादन ५०-६० वर्षांपूर्वी भारतात सुरू होऊ शकले असते, परंतु भारताने ती संधी गमावली आणि तीच परिस्थिती बराच काळ चालू राहिली. मात्र आज आपण ही परिस्थिती बदलली आहे. भारतात सेमीकंडक्टर कारखाने सुरू होऊ लागले आहेत. याशिवाय भारत लवकरच इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रात एक मोठी शक्ती बनणार आहे. भारत आता जगातील १०० देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणार आहे. या यशाशी संबंधित एक खूप मोठा कार्यक्रम मंगळवारी (२६ ऑगस्ट) दोन दिवसांनी आयोजित केला जात आहे.” अशीही माहिती मोदींनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रयत्नांवरही यावेळी प्रकाश टाकला. “आम्ही मेड इन इंडिया 6जी नेटवर्क विकसित करण्यासाठी वेगाने काम करत आहोत. जगात होत असलेल्या प्रगतीशी जुळवून घेण्यावर सरकारचे लक्ष आहे.” असंही ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

4 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

4 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

19 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago