महाराष्ट्र

आधी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच लातूरात पाय ठेवा! छावा संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा..

लातूर: विधीमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आधी राजीनामा घ्या, मगच लातूरमध्ये पाय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच त्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराच जावळे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावाच्या जिल्हाध्यक्षावर सुरज चव्हाण व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटू लागले आहे. (Manikrao Kokate) या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा इशारा देत छावाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. वातावरण पेटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितला.

दुसरीकडे विधीमंडळाच्या अधिवेशनात रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) तातडीने घ्यावा. अन्यथा त्यांना 26 जुलै रोजी लातूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा नानासाहेब जावळे यांनी पत्रकारांशी सवाद साधताना दिला. मुख्यमंत्रीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्‍यांनाही रस्त्यावर फिरु देणार नाही, असे जावळे यांनी निक्षूण सांगीतले.

छावा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात लातूर बंदमध्ये जावळे पाटील सहभागी झाले होते. विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्ना्वर चर्चा करण्याचे सोडून कृषीमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याचे राज्याने पाहिले. त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी घाडगे व काही कार्यकर्ते सनदशीर मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी गेले होते.

निवेदन दिल्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण व कार्यकर्त्यांनी घाडगे व कार्यकर्त्यांना मारहाण केली. चव्हाण यांनी कायदा हातात घेतला आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे.छावा संघटना आपल्या स्टाईलने त्याला धडा शिकवेलच. 26 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचा लातूर दौरा आहे. त्या पूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. अन्यथा त्यांना छावा संघटना लातूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, याचा पुनरुच्चारही जावळे यांनी केला.

सकल मराठा समाजही आक्रमक

विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 25 जुलैपर्यंत बडतर्फ करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक अॅड. उदय गवारे यांनी दिला आहे. कृषिमंत्री कोकाटे विवेकशून्य आहेत. दोन वर्षांची शिक्षा होऊनही त्यांना मंत्रिपदावर ठेवले आहे. पीकविम्यासंदर्भात ‘एक रुपया भिकारीही घेत नाही’, ‘ढेकाळाचे पंचनामे करायचे का”?’, ‘कृषी विभाग हा ओसाड गावची पाटीलकी आहे’, अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी याआधी उधळली आहेत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

9 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago