मेरठ: मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या २९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इशांतचे आईवडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला. कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे. त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला.
मिळालेल्या माहितीनुसार, इशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या इंग्रजी रेकॉर्ड विभागात क्लार्क म्हणून काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला नोकरी मिळाली. त्याच्या वडिलांचंही आधीच निधन झालं होतं. पाच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. तो त्याच्या पत्नीसोबत कलेक्टर ऑफिसच्या आवारात असलेल्या सरकारी निवासस्थानी राहत होता.
कुटुंब आणि कार्यालयाशी संबंधित लोकांनी सांगितलं की, रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास इशांतच्या छातीत खूप दुखू लागलं. कुटुंब आणि ओळखीच्या लोकांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे प्राथमिक तपासणी, ईसीजी आणि काही चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्याला काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि घरी पाठवलं.
सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इशांत नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये गेला. त्यानंतर अचानक त्याला पुन्हा छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि तो तिथेच पडला. पडण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी ताबडतोब बाथरूमकडे धावली आणि दार वाजवलं, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरून तिने जवळच्या शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला आणि इशांतला बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
इशांतच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याची पत्नी आता घरात एकटीच राहिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, इशांत हा अतिशय शांत, साधा आणि जबाबदार व्यक्ती होता. तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि कधीही कोणाशीही मोठ्या आवाजात बोलताना दिसला नाही.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…