महाराष्ट्र

पक्षात दिवाळी अन् माझ्या घरात अंधार

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होत सल्याची चर्चा असतानाच आता मनसेतुनच मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि राज ठाकरे यांनी बाजू भक्कमपणे मांडणारे प्रकाश महाजन यांनी आता पक्षावरची उघड नाराजी बोलून दाखवली आहे.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरासाठी स्वत: राजठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. मात्र, या शिबिराला प्रकाश महाजन यांनाच निमंत्रण दिलेलं नाही. प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांचा मीडियातील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा आहे.

महाजन यांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली. भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही, खिन्न आणि दुःखी आहे असंही प्रकाश यावेळी महाजन म्हणाले. तसंच, शिबिरासाठी बोलावलं नाही. मात्र, पक्षाच्या निष्कर्षामध्ये प्रवक्त्यांना बोलावलं नाही. इतर प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे इतर पदांची जबाबदारी असेल, माझ्याकडं नाही. त्यामुळं मला निमंत्रण आलं नाही. पक्षाचा निर्णय आहे, कुणाला बोलवाव, कुणाला नाही. हा माझ्यासाठी दुर्दैवी क्षण आहे काय बोलणार, असं प्रकाश महाजन यावेळी म्हणाले.

घरच्या लोकांसमोर तोंड राहिलं नाही. ठीक आहे मला फार काही बोलायचं नाही. मी इतर कुणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी केलं. प्रवक्ता म्हणून केलं. भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी खंत बोलून दाखवली. त्याचबरोबर मी ठरवलंय मी देव बदलणार नाही, देवानं बोलवल्याशिवाय जाणार नाही. मी कुणावर नाराज नाही. आपलं नशीब, आपलं भांडण, नशीब असेल तर हार-जीत होते. दोन भावाच्यां युतीबाबत वक्तव्य केलं होतं. हे कोणाला पटलं नसेल तर त्याची माफी मी नेत्याकडे मागितली आहे, असं महाजनांनी नमूद केलं.

दोन भाऊ एकत्र आले तर माझा फायदा काय आणि नुकसान काय? भाऊ नसण्याचं काय दुःख आहे हे मला माहीत होतं. ते एकत्र यावे ही मी भावना बोलून दाखवली. ही भावना चुकली असेल पण पक्षात दिवाळी आहे म्हणजे पक्षाचे शिबिर सुरू आहे आणि माझ्या घरात अंधार अशी सध्या स्थिती आहे. माझं बोलणं, माझा मीडियातला वावर मला त्रासदायक ठरला. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे. माझी आता भावना झाली आता बस झालं आपल्याला घरातच मान नाही तर इतर ठिकाणी काय मिळणार? असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत. अशा पद्धतीने पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू असं म्हणत प्रकाश महाजन यांच्या डोळ्यात पाणी आले. फेसबुकवर प्रतिक्रिया येतात याला पक्षातच किंमत नाही. नसलेले आरोप माझ्यावर टाकले जातात. मी गेल्या तीन चार दिवस अस्वस्थ आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

19 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

19 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

19 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

19 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

19 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

19 तास ago