शिरूर तालुका

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीदत्त विद्यालयातील मुलींचे यश

शिरुर (अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित आंतरशालेय मैदानी स्पर्धेत पिंपरखेडच्या श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी यश संपादन केले. या खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी बक्षिस देऊन गौरव केला.

सी.टी बोरा महाविद्यालय शिरुर येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत ज्ञानेश्वरी दीपक बोऱ्हाडे हिने १४ वर्षे वयोगट गोळा फेक प्रथम क्रमांक पटकावला. दीक्षा सत्यवान खांडगे हिने १९ वर्षे वयोगट लांब उडी क्रिडा प्रकारात तृतीय क्रमांक मुक्ता कैलास थोरात हिने १७ वर्षे वयोगट थाळीफेक तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मीनाक्षी मंगेश गावडे हिने सतरा वर्षे वयोगट ४०० मीटर मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या खेळाडूंना शामकांत चौधरी, एफ.एन.पंचरास, किरण कोल्हे, प्रियंका दाभाडे, नितीन कोकाटे, सचिन बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.

तालुकास्तरावर मिळवलेल्या यशाचे पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी कौतुक करत या मुलींना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचाही ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.के.मगर, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, माजी उपसरपंच नवनाथ पोखरकर, माजी उपसरपंच किशोर दाभाडे, तुकारामशेठ नरवडे,बाळासाहेब बोंबे, आबाजी पोखरकर सचिन बोंबे, दिपक बोऱ्हाडे, शेखर बोऱ्हाडे,सागर लोंढे, सचिन बोऱ्हाडे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एफ.एन.पंचरास यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

4 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago