महाराष्ट्र

उल्हासनगर-कल्याणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

उल्हासनगर : उल्हासनगर आणि कल्याण शहरासह ग्रामीण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

वीज वितरण विभागाकडून सातत्याने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, वर्षभरात देखभालीच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय का येतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

देखभालीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता किंवा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे या कामांच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देखभालीवर कोट्यवधींचा खर्च करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसेल, तर या कामांचा दर्जा आणि खर्चाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

8 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

8 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

8 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

9 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

9 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

14 तास ago