महाराष्ट्र

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण

मुंबई: कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.आर. श्रीनिवास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, या स्कायवॉकमुळे प्रवासाचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. मुंबईतील मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत. पुढील दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील सुशोभीकरणाचे कामे सुरू आहे. सर्वसामान्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीकृष्ण नगर नदीवरील पुलाचे लोकार्पण

दहिसर येथील श्रीकृष्णनगर नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी, सुनील शिंदे, राजहंस सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago