महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकारण तापले; आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा, नव्या पक्षफुटीच्या चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेगआला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे पावसाळी अधिवेशन असेल, असा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात जातील, असा दावा करत शिंदे गटाचे “ऑपरेशन टायगर” हे प्रत्यक्षात “ऑपरेशन फडणवीस” असल्याचे म्हटले. या वक्तव्यानंतर भाजपच्या गोटातही विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदारही सत्ताधारी आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही खासदार भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असली, तरी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही या चर्चांचे खंडन केले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी शिंदे गटाकडून मलाही पक्षप्रवेशाची ऑफर आली होती, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात सुरू असलेल्या पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष संपवण्याऐवजी राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याची स्पर्धा लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी, “स्वतःच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर वेगळी भाषा वापरणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

दुसरीकडे, अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई टोळीकडून पुन्हा एकदा खंडणीची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. “सेटलमेंट करा, अन्यथा थेट गोळी मारू,” असा धमकीचा फोन आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वीही फेब्रुवारी २०२६ मध्ये साजिद खान पठाण यांना अशाच प्रकारची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

7 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

7 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

7 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

7 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

8 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

18 तास ago