महाराष्ट्र

कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार ठरले अपयशी; अंबादास दानवे

नागपूर: सत्ताधारी सरकार राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी देशोधडीला लावले आहे. जनतेच हित न साधता स्वतःच हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली.

राज्य थांबणार नाही, हे ब्रीदवाक्य हे सरकार सतत म्हणत असलं तरी मागच्या अधिवेशनाची परिस्थिती पाहिली तर राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेल असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे. 5 डिसेंबरला शपथविधी होऊन सरकारला खाते वाटप करता आले नाही, असा टोला दानवे यांनी रखडलेल्या खातेवाटपावर लगावला.

सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्या भाषणावर उत्तर देताना आमचं सरकार आलं तर अस होत त्यांचं सरकार आलं तेव्हा तस होत असं म्हटले. दोन्ही उपमुख्यमंत्री त्या काळात मंत्रिमंडळात सहभागी होते हे सोयीने विसरले अशा शब्दात दानवे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या उत्तरावर टीका केली.

गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवल्याने दानवे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले. राज्यातील शिक्षण आरोग्य, उद्योग विभागाची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गुन्हेगारीत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा असून 1 महाराष्ट्र 2 ऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षात सरासरी 126 गुन्हयाची नोंद झाली आहे. 2023 मध्ये 45 हजार 434 महिला अत्याचाराच्या घटना नोंदवल्या असून सायबर गुन्ह्यात राज्य 4 थ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  12 ऑक्टोबर 2024 ला राज्याचे माजी विधानसभा सदस्य बाबा सिध्दीकी यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यापूर्वी त्यांची रेकी केली होती. आज राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या घराची रेकी झाली आहे. पुणे येथे जेल मध्ये जेलर पठाण यांना मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

म्यानमार मधील रोहिंग्याचा पुण्यात वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या झाली. सत्ताधारी यांची ही स्थिती असल्यास सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. परभणी प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू व बीडचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येबाबत दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड हा मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे. गेले 4 दिवस त्याचे नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलीस त्याला पकडू का शकले नाही असा सवाल करत आरोपींना राजकीय आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.

संभाजी नगर जिल्ह्यात 75 खूनाच्या घटना समोर आल्या असून जिल्ह्यात गुन्हेगाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथेहि ट अँड रनच्या घटना घडल्या मात्र नागपूरच्या घटनेत मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली नसून सर्वांना समान न्याय लागू करावा अशी मागणी दानवे यांनी केली.

मलकापूर अर्बन बँकेतील घोटाळा,न्याय राधा कॉ ऑपरेटीव्ह बँकेतील घोटाळ्याच्या घटना समोर आल्या आहेत. संभाजी नगर मधील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळयातही अद्याप कोणतीही कारवाई नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत गुंड मोकाट आणि सुसाट आहे तर गतिमान सरकारचा गुन्हेगारांना धाक नाही अशी टीका दानवे यांनी केली.

महाराष्ट्रातील तरुणाई ही ड्रग्सच्या विळख्यात अडकली आहे. फूड अँड ड्रग्स त्यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातातल बावल बनले असून सत्ताधाऱ्यांनी पोलीस बळाचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळात तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संतोष वडुळे यांचे बोट छटले गेल्याची घटना घडली आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत राजरोसपणे कायदे मोडले जात असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

6 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

6 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

7 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

12 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

12 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

12 तास ago