नागपूर: सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अस मुख्यमंत्री आणि ओबीसी उपसमितीतील मंत्री सांगत असले तरी ओबीसींच्या हक्कावर गदा येत आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नागपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्च्याची माहिती देण्यासाठी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते, विदर्भातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागपुरात १० ऑक्टोबर रोजी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा सकल ओबीसी संघटनांचा मोर्चा निघणार आहे. सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे हक्काचे असलेले आरक्षणाला धक्का लागला आहे. अनेक बोगस दाखले हे देण्यात येत आहेत. या सरकारमधील मंत्री, मोठे देते हे प्रशासनावर बोगस दाखले देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला. खरं तर समजातील कोणत्याही घटकाला आरक्षण द्यायचे आहे तर जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे आणि त्या त्या समाजाच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दिले पाहिजे. पण आता मात्र ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होणार आहे. अस असताना ओबीसींना धक्का कसा लागणार नाही याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. ओबीसींच्या हक्कासाठी लढायचे असल्यास प्रत्येकाने या मोर्च्यात सहभागी झाले पाहिजे. जे कोणी सरकारच्या शासन निर्णयाविरोधात आहे त्यांनी आपला पक्ष, संघटना पलिकडे जाऊन मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन आज झालेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले.
राज्य सरकारने नेमलेली उपसमिती कोणत्या कामाची नाही. इथे महाज्योतीचे पैसे मिळत नाही तिथे उपसमिती काय काम करणार, ओबीसींच्या हक्कासाठी काय लढणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी मराठा समाजाच्या उद्योजकांना १३ हजार कोटी दिले मग ओबीसी समाजासाठी त्यांच्या महामंडळासाठी किती निधी दिला हे सरकारने सांगावे, सरकारने नेमलेली उपसमिती ही फक्त नावाला आहे अशी टीका यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…