महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

मुंबई: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे. या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे.

त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्यासंदर्भात साधू महंताची बैठक होती, त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश शुल्क वसुल करणाऱ्या गुंडांनी या पत्रकारांशी बाचाबाची करत त्यांना जबर मारहाण केली. यात झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि इतर दोन पत्रकार जखमी झाले आहेत.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी कृती करणाऱ्या हल्लेखोर गुंडांना कायमचा कठोर संदेश जाईल अशी कारवाई करावी.” अशी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया मागणी करत आहे.

शीतल करदेकर 

संस्थापक अध्यक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

12 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

13 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

13 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

16 तास ago