महाराष्ट्र

दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आता जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

या निर्णयानुसार, बियाणे न उगवल्यास किंवा पीक पूर्णपणे वाया गेल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत नवीन बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांविरोधात कठोर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शासनाच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर तातडीने कृषी सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवकांकडे लेखी तक्रार नोंदवावी. त्यानंतर कृषी व महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामा केला जाईल. हा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. मंजुरीनंतर पात्र शेतकऱ्यांना नवीन बियाणे किंवा आर्थिक मदत दिली जाईल.

यासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा, ८-अ दाखला, बियाणे खरेदीची पावती, बियाण्यांचे वेष्टन किंवा शिल्लक बियाणे, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत सादर करणे आवश्यक आहे.शासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, दुबार पेरणीची वेळ आल्यास विलंब न करता तातडीने पंचनामा करून घ्यावा. कारण शासकीय मदत मिळण्यासाठी पंचनामा हा सर्वात महत्त्वाचा आधार असणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

8 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

8 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

9 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 तास ago