महाराष्ट्र

कच्छी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते कायम; ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम गेली १९ वर्षे सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, “घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छी समाज विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान करून समाजाला प्रेरणा देत आहे.” यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ४० वर्षीय तरुणाच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.

कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांच्या समाजसेवेचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत.” आषाढी बीज हा कच्छी समाजाचा नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी समाजबांधवांना शुभेच्छाही दिल्या.

ठाण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे सांगितले. अहमदाबाद-घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोस्टल रोडमार्गे वळविण्यात येणार असल्याने ठाणे शहर वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणावर मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यापारी समाजाच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत त्यांनी ठाण्यात उद्योग-व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच साकेत परिसरातील त्रिमंदिर, प्रस्तावित कॅन्सर हॉस्पिटल आणि महावीर हॉस्पिटलसारख्या उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रातही मोठी प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कच्छी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

7 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

7 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

8 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

8 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

8 तास ago