महाराष्ट्र

महायुतीचा विजय! मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांची नावं अखेर जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईच्या नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

महायुतीकडून भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्या वॉर्ड क्रमांक 132 च्या नगरसेविका आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. संजय घाडी हे दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत. उपमहापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल, अशी माहिती शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी बैठकीत दिली.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवली होती. महायुतीचे एकूण 118 नगरसेवक निवडून आले असून, त्यात भाजपचे 89 तर शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांनी महापौर व उपमहापौर पदांची घोषणा केली.

मनसेपासून शिवसेनेपर्यंतचा संजय घाडी यांचा प्रवास

मुंबईचे नवे उपमहापौर संजय घाडी हे एकेकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राजकारणाची सुरुवात केली होती. 2007 साली राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर संजय घाडी मनसेमध्ये सक्रिय होते आणि त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती.

यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. संजय घाडी यांच्या पत्नी संजना घाडी या सुद्धा नगरसेविका होत्या. मात्र, मागील वर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागील महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले असून, आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजय घाडी यांचा राजकीय आणि शैक्षणिक प्रवास

संजय शंकर घाडी हे 57 वर्षांचे असून त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं, तर दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून दहावी पूर्ण केली. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे.

1988-89 पासून ते शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख होते. 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस, शिवसेनेचे उपनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली असून, सध्या ते शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

12 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago