महाराष्ट्र

डॉक्टरांसोबत बोलतानाच अचानक आला हृदयविकाराचा झटका, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक…

कोल्हापूर: अगदी सर्दी-ताप आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. अगदी किरकोळ त्रासापासून ते एखाद्याला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हे डॉक्टर अनेकांना जणू नवं आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना सध्या कोल्हापुरमधून समोर आली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.

कोल्हापूरमधील एका घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही यामध्ये दिसणाऱ्या डॉक्टरचं कौतुक कराल. व्हिडिओमध्ये दिसतं, की डॉक्टरांसमोर एक रुग्ण बसलेला आहे. इतक्यात खुर्चीवरच अचानक त्याला हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले.

कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ अर्जुन अडनाईक यांच्या रुग्णालयात हा प्रकार घडला. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच अचानक रुग्णाला अस्वस्थ वाटू लागलं. रुग्ण खुर्चीतच अस्वस्थ झाला. यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी रुग्णाच्या छातीवर हाताने हलके ठोके देत रुग्णाचा जीव वाचवला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरसमोरच बसलेले असून ते डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत. रुग्णही खुर्चीवर बसलेला आहे. इतक्यात रुग्णाला प्रचंड अवस्वस्थ वाटू लागतं. हे पाहताच डॉक्टर क्षणाचाही विलंब न करता रुग्णाजवळ जातात आणि त्याला मृत्यूच्या दारातून परत आणतात. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago