मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांची दोन वेळा आरोग्याची चाचणी करून उपचार केले जातात मात्र त्यांना दिले जाणारे मास्क, मोजे हे फाटके असतात. ते किती वेळा दिले जातात, त्याचा दर्जा काय आहे हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र सातत्याने हा गोंधळ होत असून त्याच कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बदल्या न होणे हे आहे. यासंदर्भात तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये सन्माननीय सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
या विषयाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असून या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मॅनहोल मध्ये जाऊन लोक दगावत आहेत तरीही त्याच्यावर उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण विषयाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आपण ज्यावेळी बैठक घेणार आहात त्यावेळी यापूर्वी याबाबत झालेल्या बैठकीतील मुद्दे विचारात घ्यावेत, असे डॉ गोऱ्हे यांनी मंत्रीमहोदय उदय सामंत यांना सांगितले.
यावर मंत्रीमहोदय श्री. उदय सामंत म्हणाले की, सफाई कामगार हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. याविषयाबाबत तातडीने पूर्व तयारीचीबैठक घेतली जाईल आणि यापूर्वी झालेल्या बैठकीचे मुद्दे देखील विचारात घेतले जातील, असे सांगितले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…