मुंबई: राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत असून उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कोकणासह विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी काही ठिकाणी कमाल तापमानात थोडी घट झाली असली तरी आठवड्याच्या शेवटी पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढला आहे.
हवामान विभागाने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता आणि तो खरा ठरला आहे. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यात उत्तर कोकणातील डहाणू, मुंबई आणि ठाणे येथे तीव्र उष्णतेच्या लाटेची नोंद झाली. मुंबईत अनेक वर्षांनंतर तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला. हवामान तज्ज्ञांच्या मते, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर निर्माण झालेल्या प्रतिचक्रवात स्थितीमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. हा उष्णतेचा कल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.उष्णतेची वाढती तीव्रता लक्षात घेऊन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळा सकाळी
वाढत्या उष्णतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार १६ मार्चपासून जिल्ह्यातील सुमारे ३०८० शाळा सकाळी ७ ते दुपारी साडेबारापर्यंत भरवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
जळगावमध्ये सर्वाधिक तापमान
मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पारा ४१ अंशांपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले असून नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. उष्माघाताच्या शक्यतेमुळे वैद्यकीय यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
यवतमाळमध्येही सकाळचे सत्र
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सर्व शाळाही १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी याबाबत आदेश दिले आहेत. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका लहान विद्यार्थ्यांना बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेळेनुसार शाळा सकाळी ७.२० ते ११.३५ या वेळेत भरवण्यात येणार आहेत.
कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…
६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…
निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…
'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…
कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…