महाराष्ट्र

देहविक्रीच्या दलदलीत 12 वर्षाची चिमुकली कशी अडकली

मुंबई: मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी दुष्कृत्य केल्याची माहिती दिली.

१२ वर्षीय चिमुकली मुळची बांगलादेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. २६ जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकत अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्यानं या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी धाड टाकत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. तसेच या रॅकेटच्या संबंधित १० जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेसंदर्भात हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई म्हणाले, ‘१२ वर्षीय चिमुकलीचे रिमांड होममध्ये काउन्सलिंग करण्यात आले आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिनं सगळा प्रकार सांगितला. तिला गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते. नंतर तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी तिचं लैंगिक शोषण केलं’.

ही चिमुकली शाळकरी विद्यार्थी आहे. एका विषयात ती नापास झाली होती. आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीपोटी तिनं घर सोडलं. बांगलादेशहून भारतात आली. काही लोकांना मुलगी एकटी दिसली. मदतीची भुलथाप देत तिला वेश्याव्यवसायात ढकललं.’ दरम्यान, मथाई यांनी पोलिसांकडे २०० पुरूषांना अटक करण्याची मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

9 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

11 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago