पुणे: महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करून पुण्यात प्रचार केला. महिनाभर शहरात तळ ठोकून त्यांनी झंझावाती प्रचार केला असला, तरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा दुसरा मोठा पक्ष ठरला.
या निकालानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी सक्षम चेहरा निवडण्याचे अधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार पवार यांनी मंगळवारी अॅड. निलेश निकम यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली. मात्र या निर्णयाबद्दल दादांचे आभार मानण्याची संधी निकम यांना मिळालीच नाही.
महिनाभराचा झंझावाती प्रचार
महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गेल्या महिनाभर पुण्यात मुक्काम करून होते. जनतेकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पक्षाला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. निकालात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद पक्षालाच मिळाले.
निवडीचा अधिकार दादांकडे
विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची निवड करावी, याबाबत शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निवडीचा अंतिम अधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. पक्षाकडून तीन ते चार नावे पवार यांच्यासमोर मांडण्यात आली होती. त्यातून पवार यांनी अॅड. निलेश निकम यांच्या नावाला पसंती दिली.
आभार मानण्याआधीच काळाने घाला घातला
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अॅड. निकम बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून पवार यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र पवार यांचा फोन बंद होता. आठ वाजता पुन्हा संपर्क साधल्यानंतर दादा विमान प्रवासात असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांकडून देण्यात आली.
काही वेळातच सुनील टिंगरे यांच्याकडून अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी निकम यांना समजली.“मी दादांचे आभार मानण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन करत होतो. मात्र त्यांच्याशी बोलणं झालंच नाही. दादांचे आभार मानायचे राहून गेले,” असे सांगताना अॅड. निलेश निकम यांचा कंठ दाटून आला.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…