महाराष्ट्र

रनवेवर थरारक क्षण! एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर येताच गो-अराउंड, 10 मिनिटे हवेत घिरट्या अन्…

जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित पहिल्या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग

एअरपोर्ट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं AI-1719 हे विमान दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर विमानतळावर पोहोचलं. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीला स्पर्श करताच तांत्रिक किंवा धावपट्टीवरील स्थितीमुळे लँडिंग फेल झालं.

धोका लक्षात येताच पायलटनं क्षणाचाही विलंब न करता ‘गो-अराउंड’चा निर्णय घेतला. विमानाने सुमारे 10 मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात यश आलं.या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हेही प्रवास करत होते. सुदैवानं ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

‘गो-अराउंड’ म्हणजे काय?

लँडिंगवेळी विमान सुरक्षितपणे उतरवता येणार नाही, अशी शंका पायलटला वाटल्यास तो विमान पुन्हा हवेत उडवतो. यालाच ‘गो-अराउंड’ म्हणतात. हा निर्णय अनेकदा मोठे अपघात टाळतो. जयपूरमध्येही पायलटच्या या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

2 तास ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

1 दिवस ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago