महाराष्ट्र

सरसकट मराठा आरक्षण दिलं, तर दुसऱ्याच दिवशी कोर्टात खेचू; छगन भुजबळ

मुंबई: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकारला चांगलंच अडचणीत आणलं असताना, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारसमोर थेट चेतावणीच दिली आहे. “सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार!” असा थेट इशारा त्यांनी दिला.

सोमवारी ओबीसी नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आधीचे निकाल समोर ठेवले. या निकालांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, “मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, तर प्रगत आहे” आणि मराठा-कुणबी एकत्रीकरण शक्य नाही.

भुजबळ म्हणाले, “जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं, तर आरक्षणाची रचना कोलमडेल. आमचा लढा सुरूच राहील.” यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावरील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. त्यांची मागणी – संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे – सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

भुजबळ यांचा ठाम विरोध, “ओबीसींच्या वाटपातील आरक्षण दुसऱ्याला देता कामा नये.”

त्यांचा इशारा स्पष्ट होता “सरकारने जर असं पाऊल उचललं, तर आम्हीही मैदानावर उतरू, उपोषण करू, जिल्ह्याजिल्ह्यांतून मिरवणुका काढू, आणि लाखोंच्या संख्येने मुंबईत धडक देऊ.” भुजबळ पुढे म्हणाले, “एखाद्या जातीला अमुक एका प्रवर्गात टाकणं, हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत नाही. मग ते फडणवीस असोत वा शरद पवार.”त्यांनी सरकारला सूचित केलं की आरक्षणासारखे संवेदनशील निर्णय कायद्याच्या चौकटीत घ्यावेत, अन्यथा तीव्र प्रतिक्रिया ओबीसी समाजाकडून येतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

4 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

4 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

4 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

8 तास ago