महाराष्ट्र

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची उच्च माहिती व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नेमक काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

जे विद्यार्थी MPSC परीक्षेची तयारी करून पुर्व परीक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार आहे. यामुळे सरकारचाही पैसाही वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदला देखील मिळेल. ज्यांनी अशा पद्धतीचे नोकर भरती कंत्राट घेतलेले असते तो कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. त्यांना व्यवस्थित पगार देखील मिळत नाही. जर अशा पद्धतीने भरती झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. मात्र हा फक्त केवळ एक विचार आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून घेतला जाईल’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार?

जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करून पुर्व परीक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ही योजना अंमलात आल्यास ज्या विद्यार्थ्यांनी MPSC ची पूर्व परीक्षा पास केली आहे, अशा विद्यार्थ्यांना देखील नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

4 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

8 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago