महाराष्ट्र

प्रेमविवाह केल्याच्या रागातून भरचौकात जावयाला बेदम मारहाण, लेकीचं अपहरण

खेड: पुण्यातील खेडमध्ये ‘सैराट’ चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये तरुणाला जबर मारहाण करत त्याच्या २८ वर्षीय बायकोचे अपहरण करण्यात आले. पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथील ही धक्कादायक घटना आहे. ‘सैराट’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे हा मारहाण आणि अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीच्या आई आणि भावानेच हे धक्कादायक कृत्य केले आहे.

विश्वनाथ गोसावी आणि त्याची बायको प्राजक्ता गोसावी असे मारहाण करण्यात आलेल्या नवरा-बायकोची नावं आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विश्वनाथ गोसावीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे प्राजक्ताचे कुटुंबीय प्रचंड चिडले होते. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना आधी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे अपहरण केले.

भरचौकात ही मारहाण आणि अपहरणाची घटना घडली. घटनास्थळी उपस्थितांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यामध्ये मुलीचा भाऊ आणि आईसह १५ जणांविरोधात अपहरण आणि जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

8 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago