महाराष्ट्र

जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

मुंबई: इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अँड वाइव्हस् असोसिएशन (IASOWA) यांनी ग्लॉकोमा आजाराचा धोका लक्षात घेता कावसजी जहांगीर नेत्र विभाग, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह यांना ५ लाख रुपयांचे नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस यंत्र उपलब्ध करुन दिले आहे. याचे लोकार्पण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते २९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. ग्लॉकोमा आजाराचा सामना करण्यासाठी ओ. पी. डी. कावसजी जहांगीर नेत्र विभाग, जे. जे. रुग्णालय, यांना नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओ लेन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुगणालय समूह यांनी IASOWA चे आभार व्यक्त केले.

ग्लॉकोमा हे संपूर्ण जगात अपरिवर्तनीय पण टाळता येणारे अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे आणि ते जवळपास ८ टक्के जागतिक अंधत्वासाठी जबाबदार आहे. सन २०१० मध्ये संपूर्ण जगभरात ग्लॉकोमाचे प्रमाण ६०.५ दशलक्ष होते आणि २०२० पर्यंत ते ८० दशलक्ष झाले असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण जगभरातील ३९.३६ दशलक्ष अंध लोकांपैकी तीन दशलक्षांहून अधिक लोक ग्लॉकोमामुळे अंध आहेत.

भारत हे जागतिक अंधत्वाच्या सर्वाधिक प्रादेशिक भारासाठी (२३.५%) जबाबदार आहे. ग्लॉकोमा हा मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) आणि अपवर्तक दोष (रेफ्रॅक्टिव्ह एरर) नंतर अंधत्वाचे तिसरे प्रमुख कारण आहे. ग्लॉकोमाचे प्रमाण ११.९ दशलक्ष असून त्यात अंधत्वाचे प्रमाण ८.९ दशलक्ष आहे. ग्लॉकोमा १२.८% अंधत्वासाठी जबाबदार आहे.मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दरमहा सुमारे १५०-२०० ग्लॉकोमा रुग्ण पाहिले जातात. डोळ्यांमधील वाढलेला दाब (Intraocular Pressure – IOP) हे ग्लॉकोमाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

ग्लॉकोमा निदानासाठी वापरले जाणारे उपकरणे

नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर (Non-Contact Tonometer – NCT): हे एक उपकरण आहे जे डोळ्यांचा दाब (IOP) लवकर आणि डोळ्याला थेट स्पर्श न करता सहजपणे तपासते. यामुळे रुग्णाला अधिक आराम मिळतो, तांत्रिक सहायकावरील अवलंबित्व कमी होते आणि संसर्गाचा धोका टाळता येतो.

गोनिओस्कोपी (Gonioscopy): हा एक नियमित तपासणीचा प्रकार आहे, ज्याद्वारे आईरिस आणि कॉर्निया यामधील कोन (Iridocorneal Angle) मोजला जातो. गोनिओलेंस (Gonioscope) व स्लिट लॅम्प किंवा ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने हे परीक्षण केले जाते. ग्लॉकोमाचे निदान व उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओलेंस ही ग्लॉकोमाचे त्वरित निदान आणि उपचार करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपकरणे आहेत.

ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह, मुंबई हे १८० वर्षांच्या गौरवशाली इतिहास असलेले एक प्रतिष्ठित आणि अग्रगण्य वैद्यकीय संस्थान आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी ही सर्वात जुनी वैद्यकीय संस्था असून, येथे वैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तसेच, या रुग्णालयात सर्वसामान्य आरोग्य सेवेपासून सुपर-स्पेशॅलिटी आणि तृतीयक आरोग्य सेवेपर्यंत रूग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवली जातात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

4 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago