मुख्य बातम्या

शिरुर शहरात प्लॅस्टिक वापरणारे व विक्री करणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषद व शिरुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शिरुर शहरातील अवैध प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड तर ६४ कीलो प्लास्टिक जप्त केले असल्याची माहिती शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.

 

शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील व पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली (दि ३०) रोजी शिरुर नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

यामध्ये सदर ठिकाणी जाऊन दुकानांची तपासणी करुन १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करून एकूण ७५ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तर ६४ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले.

 

सदर कार्यवाही शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय बर्गे तसेच स्वच्छता मुकादम मनोज अहिरे, सागर कांबळे, सफाई कर्मचारी मयूर जाधव, गणेश शेंडगे, रमेश चव्हाण, वामन जाधव,राणी गव्हाणे, इंदुबाई मोरे, विद्या म्हस्के शितल घारु, काळूराम आसवले, पोलिस अंमलदार मनीषा फंड व रघुनाथ हळनोर यांच्या पथकाने केली आहे.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

शिरुर; शेतकऱ्यांना वन विभागाकडून सोलर झटका मशीनचे वाटप

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago