महाराष्ट्र

भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी? मिलिंद नार्वेकरांचा सवाल; नक्की काय चाललंय?”

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतून (BMC) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची तब्बल २५ वर्षांची सत्ता खेचून आणल्यानंतर आता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईत सत्ता मिळाल्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या चर्चांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार Milind Narvekar यांच्या एका ट्वीटमुळे अधिक उधाण आले आहे. नवनिर्वाचित महापौरांच्या संदर्भात नार्वेकरांनी सूचक ट्विट करत “नक्की काय चाललंय?” असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे.

नार्वेकरांनी आपल्या ट्विटमध्ये महापौरांविरोधात प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांची कात्रणे शेअर केली आहेत. त्यात महापौरांच्या कारवरील लाल आणि निळ्या दिव्यांच्या वापरावरून निर्माण झालेल्या वादाचा उल्लेख आहे. या प्रकरणावरून स्वतःच्याच पक्षातील काही गट महापौरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

महापौरांच्या अधिकारांबाबत किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपमध्येच दोन गट पडले आहेत का, अशी शंका या ट्विटमुळे अधिक गडद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील भाजपच्या अंतर्गत राजकारणाची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनाई आदेशानंतरही महापौरांनी अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रशासनाला पत्र लिहिल्याची माहिती समोर आली होती. त्या घटनेनंतरही भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

मुंबई महापालिकेत सत्ता गेल्यानंतर ठाकरे गट भाजपमधील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे मानले जात आहे. नार्वेकरांच्या ट्विटमुळे एकीकडे महापौरांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा आणि दुसरीकडे भाजपमधील विसंवाद अधोरेखित करण्याचा दुहेरी राजकीय डाव साधल्याची चर्चा रंगत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago