महाराष्ट्र

सध्याच्या देशातील परिस्थिती वरून खरंच स्वतंत्र उरलं आहे का?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना म्हणाले आहे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र स्वातंत्र्याच्या 77 वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वतंत्र उरलं आहे का? असा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे. याला सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रात असलेल्या परिस्थिती मुळे असा प्रश्न पडला आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, ज्याप्रमाणे मणिपूर पेटवले गेले त्या ठिकाणी महिलांवर झालेला अत्याचार मात्र तरी देखील स्थानिक सरकार आणि केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज या देशात द्वेषचं राजकारण एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे की माणुसकी उरणार की नाही असा प्रश्न पडला आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला आपली लोकशाही टिकवावी लागेल सध्या सर्वात मोठा हल्ला हा लोकशाहीवर होत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की मी पुन्हा येईल जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखले पाहिजेत तरच लोकशाही टिकवता येईल. महाराष्ट्र कधीही दिल्ली समोरं झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला त्यावेळी मदतीला सह्याद्री मदतीसाठी धावून गेला आहे. शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या तळागाळात आहे. महाराष्ट्रातील जनता शरद पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. लोकशाहीच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला पाहिजे असेही देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे

ठाण्यातील कळवा येथे जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण दगावले आहे. मात्र राज्य सरकार यावर कुठलेही ठोस भूमिका घ्यायला तयार नाही आहे. रुग्णालयातील बेजबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने मी त्यांना ठाण्यातील एक नागरिक या नात्याने विनंती करतो की त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago