महाराष्ट्र

लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करुया

मुंबई: लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्षाचे नेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पक्ष अधिक बळकट कसा करता येईल यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने त्यांनी सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपला देश प्रगतीपथावर चालत राहण्यासाठी देशामधील सामान्य शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार, युवा, महिला अशा सर्व घटकांचा समावेश असावा असे मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.

आपण मिळून राज्याची आणि देशाची उत्तमरीत्या सेवा करूया. लोकांची आपल्या पक्षाकडून असलेली अपेक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा संकल्प करूया. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली १९९९ साली आपल्या पक्षाची स्थापना करताना आपण जो संकल्प केला होता त्याप्रमाणे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उन्नती सतत होत राहिली. आजचा दिवस हा देशासोबतच आपल्या पक्षासाठीही शुभ दिवस आहे. राज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. राज्यकर्त्यांना केवळ सत्तेसाठी संधी मिळत नाही तर खऱ्या अर्थाने आपले विचार आणि आचारांनी लोकांच्या सेवेची आणि विकासाची जबाबदारी मिळते, ती जनसेवेत अर्पित करण्याचा प्रयत्न करूया असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले

आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे देशाच्या प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान राहिल; सुनिल तटकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान, धर्मनिरपेक्ष विचार दिले. यातून देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम आपण प्रत्येकाने मिळून करायला हवे. आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे देशाच्या प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान राहिल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

देशातील संसदीय लोकशाही प्रणाली, एकात्मता, अखंडता, देशाची जलद गतीने विकसित होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु ठेवणे हे २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. देशाच्या अमृतमहोत्सवाचा देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रत्येक भारतीयाने देशाप्रतीच्या आपल्या योगदानातून देशाचे भवितव्य जगाच्या पाठीवर अधोरेखित करण्याचे काम करावे, असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago