पनवेल: जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता मान्यवर कवींच्या कवि संमेलनाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे.
मराठी भाषेचे सौंदर्य,काव्य सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” या कार्यक्रमामध्ये उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करायला लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर आपल्या कविता सादर करणार आहेत. याबरोबरच कुठे तरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले… घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले अशा धीर गंभीर कवितेतून नाजूक कोमल भावना व्यक्त करणारे कवि प्रशांत मोरे, तर दुसऱ्या भाषेने पैसा, संपत्ती सारं सारं काही दिलं… पण अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठीने जगण्याचे “चीज” केले अशी मराठीची स्तुती करणारे कवि डॉ. विजय देशमुख आणि कवयित्री डॉ. स्मिता दातार, मृणाल केळकर, महानंदा मोहिते आपल्या कविता सादर करणार आहेत.
काव्यवाचन स्पर्धा
पनवेल महानगरपालिका अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काव्य प्रतिभेला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता ‘कविता वाचन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनालाचा लाभ इच्छुकांनी जरूर घ्यावा. असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…