महाराष्ट्र

शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे

‘संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण’ यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न 

नाशिक: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीत महिलांचे संघटन, त्यांची व्होट बँक तयार करणे आणि सभासद नोंदणी मोहीम राबवण्याचे महत्त्व यावर चर्चा झाली.

याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी संघटित होऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पोलीस, वकील आणि डॉक्टर यांसारख्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जनता दरबार आयोजित करणे गरजेचे आहे.” तसेच, महिलांनी कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडवून एकत्र राहण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे*, असे सांगत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी शिवसेना कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असेही त्यांनी सूचित केले.

४ थे महिला धोरणावर सविस्तर चर्चा

या बैठकीत महिलांसाठीच्या चौथ्या महिला धोरणाचा कसा फायदा करून घेता येईल, यावरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या धोरणाअंतर्गत महिलांसाठी नवीन योजना, अर्थसहाय्य, रोजगार संधी, सुरक्षाविषयक सुधारणा आणि नेतृत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असेही त्यांनी सांगितले. महिलांनी या धोरणाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी जागरूक राहावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीस शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी दिंडोरी लोकसभा जिल्हाप्रमुख ॲड. श्रद्धा कुलकर्णी, श्रीमती मंगला भास्कर, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमती पूजा वाघ, इगतपुरी ग्रामीण जिल्हा प्रमुख श्रीमती पूजा धुमाळ, नाशिक महानगर प्रमुख श्रीमती अस्मिता देशमाने, नाशिक जिल्हा समन्वयक शामला दीक्षित आणि दिंडोरी लोकसभा जिल्हा प्रमुख श्रीमती रोशनी कुंभार्डे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रभागसंख्या आणि नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने आगामी निवडणुकीसाठीही चर्चा करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सभासद मोहीम राबवण्याची आवश्यकता असून, शिवसेना महिला आघाडीने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

22 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago