महाराष्ट्र

निवडून आलात म्हणजे हवेतील भाषा चालणार नाही; सहर शेख यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा थेट इशारा

मुंब्रा पालिकेतील एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सहर शेख यांनी “अहंकारी लोकांना जनतेने कसे हरवले ते पाहिले ना?” अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत थेट इशारा दिला आहे.

“निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. अशा खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.

रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, “ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायम शिव–शाहू–फुले–आंबेडकरांची विचारधारा जपली आहे. मात्र काही दिवसांपासून MIM च्या स्थानिक उमेदवारांकडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली जात आहे. निवडणूक लढवण्यासाठी MIM ला फंडिंग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी-टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको.”

“निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा लोकांची कामं करा. आम्ही मात्र कायम आव्हाड साहेब यांच्यासोबत आहोत,” असे ठाम मतही रोहित पवार यांनी व्यक्त केले.

या प्रकरणामुळे मुंब्रा-कल्याण परिसरातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago