महाराष्ट्र

अजय देवगणला लॉन्च करणारे दिग्दर्शक कुकू कोहली काळाच्या पडद्याआड

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निधनापूर्वी कुकू कोहली पत्नी अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासोबत फोनवर संवाद साधत होते. दोघांमध्ये गप्पाही सुरू होत्या. यावेळी कुकू कोहली यांनी पत्नीला, ‘जास्त अति करू नकोस’, असे शेवटचे शब्द सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्यात यश आले नाही.

कुकू कोहली यांचे खरे नाव अवतार कोहली होते. ४ जून १९४९ रोजी जन्मलेल्या कुकू कोहली यांनी तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. दिग्दर्शक, लेखक, संपादक आणि पटकथालेखक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी शोमन राज कपूर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. ‘बॉबी’, ‘प्रेम रोग’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर सनी देओलच्या पदार्पणाच्या ‘बेताब’ चित्रपटात त्यांनी सेकंड युनिट डायरेक्टर म्हणून काम केले.

कुकू कोहली यांनी ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘कोहराम’, ‘जुल्मी’ आणि ‘अनाडी नंबर १’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘हकीकत’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.

कुकू कोहली यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी दिग्दर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे ते कायम स्मरणात राहतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

7 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

8 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

8 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

8 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

8 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

13 तास ago