महाराष्ट्र

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद; वाढदिवसाला आले २५ हजारावर शैक्षणिक साहित्य

मुंबई: आपल्या वाढदिवसानिमित्त हार,पुष्पगुच्छ केक व भेटवस्तू न आणता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गो-हे यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून २५ हजाराच्यावर शैक्षणिक साहित्य आल्याची माहिती गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून मिळाली आहे .दरम्यान डॉ गोऱ्हे यांनी आवाहन केलेल्या या शैक्षणिक उपक्रमाची राज्यभर चर्चा होत आहे .

विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे या महिलांच्या अन्याय अत्याचार तसेच सामाजिक,शैक्षणिक तसेच अन्याय अत्याचाराच्या विषयावर मागील अनेक दशकांपासून कार्यरत आहेत . महिलांचे विषय त्या गांभीर्याने हाताळत असतात यातच आता त्यांनी समाजातील आर्थिक दुर्बल घटक, गरजू आणि आदिवासींच्या शैक्षणिक विषयावर पुढाकार घेतला आहे . या उपक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हार, पुष्पगुच्छ, केक तसेच विविध भेटवस्तू न आणता वह्या पेन, पेन्सिल, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य सोबत घेऊन यावे असे आवाहन त्यांनी केले होते . त्यांच्या या अभिनव आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते ,पदाधिकारी ,विविध संस्था संघटना व नागरिक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर वह्या, चित्रकला पेन , पेन्सिल एमपीएससी व इतर पुस्तके,आदी विविध शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . हि संख्या २५ हजारच्या वर असल्याची माहिती डॉ . गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली .गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयावर काम करणाऱ्या संस्थेला सादर सहितय सुपूर्द केले जाणार आहे . दरम्यान गोऱ्हे यांच्या या अभिनव उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून समाजाप्रती त्यांच्या दायित्वाची प्रचिती येत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे .

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

13 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago